आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी संघटनेचे नेते बोर्डे यांचा इशारा:कपाशी, सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यासाठी स्वाभिमानीतर्फे लढा उभारणार

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन व कापसाचा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. विमा रक्कम मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी सांगितले.जाफराबाद तालुक्यातील आडा येथे आयोजित स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात शेती व शेतकऱ्यांच्या अडचणीवर चर्चा झाली. कृषी योद्धा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात यांनी मार्गदर्शन केले. बोर्डे म्हणाले, शेतकऱ्यांची चळवळ टिकली पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांप्रती संवेदना असणाऱ्या प्रत्येकाची आहे. येणाऱ्या काळात सोयाबीन, कापुस, ऊस या पिकाच्या भाववाढ व न मिळालेला पिक विमा यासाठी लढा उभा करणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजक अशोकराव गायकवाड, तालुकाध्यक्ष सुभाष भोपळे, गजानन भोपळे, हनुमंत मुरकुटे, योगेश पायघन, कैलास राऊत, प्रदीप नरवाडे, खरात, रामभाऊ बोडखे, सतीश नानगुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...