आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोट्या:विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये गोळ्या, मोबाइल, गोट्या

विद्या गावंडे औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औषधासारख्या रॅपिंगमधल्या खाऊच्या गोळ्या, मेकअपचे किट, लिपस्टिक, मोबाइल आणि गोट्या... ही यादी आहे मुलांच्या स्कूल बॅगमध्ये सापडणाऱ्या खजिन्याची. शाळेचं दप्तर म्हणजे मुलांच्या भावविश्वाचं प्रतीक समजलं जातं. म्हणूनच “दिव्य मराठी’तर्फे मुलांच्या भावविश्वाचा शोध घेण्याच्या उद्देशाने त्यांंच्या स्कूल बॅॅग्जमधील खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक गमतीशीर गोष्टी पुढे आल्या आहेत.

अनेक शाळांमध्ये शिस्तीसाठी शिक्षक विद्यार्थ्यांचे दप्तर तपासतात. या वेळी दप्तरात काय आढळते याची माहिती “दिव्य मराठी’ने विविध शाळांमधील शिक्षकांकडून संकलित केली. यात स्कूल बॅग्जमधून नेलकटर, नेलपॉलिश, लिपस्टिक अशा वस्तू सापडल्या. विद्यार्थ्यांच्या बॅग्जमधून गोट्या, पझल्स, मोबाइल, गॉगल्स आढळले. प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थ्याने तर इतरांना घाबरवण्यासाठी एका डबीत मुंगळा, त्याला खाण्यासाठी साखर असा खुराकही आणल्याचे शिक्षकांनी सांगितले. औरंगपुरा, चौराहा परिसर व तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये नुकतीच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगची तपासणी केली. अनेक विद्यार्थी वेळापत्रकापेक्षा अतिरिक्त पुस्तके आणत असल्याचेही यात आढळून आले. एका विद्यार्थ्याने औषधांच्या पॅकिंगमधील गोळ्याही आणल्या होत्या.

कोरोनानंतर अशा रपिंगमधील गोळ्यांचे मुलांना आकर्षण वाढल्याचे शाळेनजीकच्या दुकानदारांचे म्हणणे आहे. एक विद्यार्थिनी तिचा आवडता टेडी बेअर आणत असल्याचेही एक उदाहरण आढळले.

लिपस्टिक आणि बंदुकीचे खोडरबरर्स : खोडरबर्स ही प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विशेष असलेेले साहित्य. यात खोडण्याच्या उपयोगापेक्षा तिचा आकार व रूप हेच अधिक लक्षवेधी ठरते. मुलींच्या दप्तरात लिपस्टिक्सच्या आकाराचे खोडरबर्स, तर मुलांच्या दप्तरात बाइक, बंदूक या आकाराचे खोडरबर्स अधिक प्रमाणात सापडत असल्याचे शिक्षक म्हणाले. मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये रिळ्सची धूम आहे. त्यामुळे गॅदरिंगच्या वेळी स्कूल बॅग्जमधून स्विच्ड ऑफ केलेले मोबाइल आणायचे, लपूनछपून फोटो काढायचे, रिळ्स तयार करायचे असे उद्योग मोठे विद्यार्थी करीत असल्याचे शिक्षकांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...