आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:"पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा'

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार योजनेस राज्य शासनाने १८ जुन २०२१ रोजी मंजुरी दिली आहे.विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची खूप गरज आहे. जालना जिल्ह्यामध्ये मृग बहार २०२२ मध्ये सदर योजना मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरू, लिंबू व सिताफळ या अधिसूचित पिकांकरिता अधिसूचित महसूल मंडळामध्ये एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. मार्फत राबविण्यात येत आहे.

सदर योजना शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनानुसार कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. याबाबत बँक कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास पीकविमा नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबधीत बँकेस कर्जदार शेतकऱ्यांनी कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...