आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:कूलर वापरताना सुरक्षेची काळजी घ्या : महावितरण‎‎

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापमान वाढल्याने कुलरचा वापर‎ मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.‎ मात्र खबरदारी न घेतल्याने‎ अपघाताची शक्यता असते.‎ त्यासाठी नागरिकांनी कुलर‎ वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी‎ घ्यावी, असे आवाहन महावितरणने‎ केले आहे.‎ कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा‎ वापर करावा. कुलरमध्ये पाणी‎ भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद‎ करून प्लग काढून ठेवावा म्हणजे‎ कुलरचा विजेशी काहीही संबंध‎ राहणार नाही. पाणी भरताना ते‎ टाकीच्या खाली सांडून बाजूला‎ जमिनीवर पसरणार नाही, याची‎ खबरदारी घ्यावी.

पाणी भरल्यानंतर‎ प्लग पिन लावून स्विच चालू करावे.‎ त्यानंतर कुलरच्या कुठल्याही‎ भागाला स्पर्श करू नये. कुलरचे‎ कनेक्शन व वायरिंग अधिकृत‎ कारागिराकडून तपासून घ्यावे.‎ अर्थिंगची तपासणी करून घ्यावी.‎ अर्थिंग व्यवस्थित असल्यास‎ लिकेज करंट येत नाही. कुलरच्या‎ आतील वायर पाण्यामध्ये बुडणार‎ नाही याची काळजी घ्यावी. पंपातून‎ पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद‎ करून नंतरच कुलरला हात लावावा.‎ ओल्या हातांनी कुलरला कधीही‎ स्पर्श करू नये. लहान मुलांना नेहमी‎ कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे‎ आणि ती कुलरजवळ खेळणार‎ नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.‎ कुलरच्या लोखंडी बाह्यभागात‎ वीजप्रवाह उतरू नये यासाठी‎ कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल,‎ अशी व्यवस्था करावी; जेणेकरून‎ कुलरच्या लोखंडी बाह्यभागात‎ वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का‎ बसणार नाही.

कुलरमधील पाण्याचा‎ पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे‎ बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा‎ वापर करावा. यामुळे विजेचीही‎ मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे.‎ कुलरबाबत माहिती नसल्यास‎ कनेक्शन बदल करू नये. कुलरची‎ दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग‎ काढून नंतरच काम करावे. कुलरच्या‎ प्लगला जोडलेली वायर खंडित वा‎ जीर्ण झालेली असल्यास बदलून‎ दुसरी लावण्यात यावी.‎ अनेकदा पाण्याची पातळी खोल‎ गेल्याने पंप सुरू करूनही पाणी‎ खेचले जात नाही व तो पंप एअर‎ लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग‎ करणे आवश्यक असते. मात्र चालू‎ पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कुलर‎ हलवताना प्लग पिन काढून नंतरच‎ त्याची हालचाल करावी. कुलर पंप‎ अधूनमधून बंद करावा. असे‎ कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...