आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शून्य मशागत तंत्राद्वारे जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्या

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शून्य मशागत तंत्राद्वारे कमी खर्चात शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर येथील कृषी अभ्यासक प्रताप चिपळूणकर यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी आणि महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विज्ञान मंडळाचे ३०४ वे मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, महाराष्ट्र सीताफळ उत्पादक महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, प्रगतशील शेतकरी अंकुशराव भालेकर, नंदकिशोर पुंड, कृषी तंत्र अधिकारी प्रियंका जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांची उपस्थिती होती. चिपळूणकर म्हणाले, अलीकडील काळात शेती व्यवसायातून महत्तम उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर तसेच जमीन सतत पिकाखाली राहणे पाण्याचा योग्य वापर जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे, यामुळे पिकाची खुंटलेली वाढ उत्पादनाचे गुणांमध्ये घट जमिनींना पीक होणे समस्याग्रस्त क्षेत्रांमध्ये वाढ उत्पादन क्षमतेमध्ये घट आधी बाबी निदर्शनास येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी हा त्रास न होता कमी खर्चामध्ये करायचा उत्पादनाचे तंत्रज्ञान आत्मसात करावे. यासाठी शेती नियोजनामध्ये जमिनीच्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृदं व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंबन करणे आवश्यक आहे. बोराडे यांनी मातीचे महत्त्व हे जागतिक पातळीवर समजलेले आहे, त्यामुळे माती पासूनच शेतामध्ये धान्य तयार होतं आणि या धान्यापासूनच संपूर्ण जगाचे पोट भरले जाते, मातीचा अभ्यास अजून करणे महत्त्वाचे आहे,

मातीपासूनच येणारा काळामध्ये आपण जगाची भूक भागू शकतो त्यामुळे शेती ही आनंदाने करून मातीची काळजी घ्यावी, असे मत केले. प्रास्ताविकात डॉ. सोनुने म्हणाले, उत्पादनामध्ये सहभागी असणाऱ्या घटकांमध्ये जमीन हा एक अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे जगामध्ये मृदा दिन हा साजरा केला जातो, जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादनासाठी उपयुक्त ठरतात, याच अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, गेल्या अनेक दशकांपासून शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाचे काम करत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या मृदा आरोग्य पत्रिकांचेही वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...