आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवाशांचे निवेदन:पेशवेनगरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

भोकरदन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या भोकरदन शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने वैतागलेल्या पेशवे नगरच्या शहरवासीयांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे, जून्या भोकरदन शहरातील पेशवेनगर परिसरात मागील वर्षभरापासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामध्ये डुकरांचा सतत संचार असल्याने गल्ल्या अस्वच्छ झाल्या आहेत गाई व इतर गुरेढोरे ही यांचा जुन्या भोकरदन मध्ये मुक्त संचार सुरू असतो त्याचप्रमाणे मोकाट कुत्रे हे मोकळ्या जागेमध्ये सतत बसलेले असल्याने त्यांचाही उपद्रव सर्वत्र होत आ.

त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झालेली आहे विशेष म्हणजे भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारे जलकुंभ हे पेशवेनगरात आहे. या जलकुंभाचे व गावातील जलवाहिनीचे सर्व वॉल उघड्यावर असून त्यामध्ये या घाणीचे मिश्रण होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येत आहेत वेळोवेळी सूचना देऊनही आतापर्यंत नगर परिषदेकडून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी अॅड. नरेंद्र देशपांडे, माजी नगरसेवक प्रवीण देशपांडे, सुनील देशपांडे, अविनाश देशपांडे, सूर्यकांत जोशी, मकरंद देशपांडे, मंगेश देशपांडे, रत्नाकर तांदूळजे, मंगेश मुळे, अनिल देशपांडे यांच्यासह शंभर ते दीडशे नागरिकांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...