आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैव:ग्रामीण भागातील तलाठी सजे नावालाच; नागरिकांना करावा लागत आहे अनेक अडचणींचा सामना

रामनगर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तलाठी सजा कार्यालय नुसती शोभेची वस्तू बनल्याचे चित्र ग्रामीण भागात बघण्यास मिळत आहे. शेतकरी व नागरिक कामासाठी आले असता फक्त कार्यालयाचा फलक दिसतो कार्यालय बंदच असते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे याची दखल घेत प्रशासणाने तलाठी कार्यालये कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्याची मागणी नागरिक करत आहे, जालना तालुक्यातील रामनगर तलाठी सजा अंतर्गत रामनगर (सा.का), सावरगाव, हडप, साळेगाव ही चार गावे येत असून रामनगर ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत तलाठी यांचे कार्यालय आहे.

ग्रामस्थांना तलाठयाच्या डिजिटल सहीच्या सातबाऱ्यासह जमिनीचा दाखला काढणे, वाटणीपत्रक करणे, हक्कसोड करणे, फेरफार नक्कल, बोजा चढविणे व उतरविणे, निराधार योजना, दिव्यांग योजना उत्पन्नाचा दाखला आदी कामे असतात. परंतु तलाठी हे आठवड्यात एखाद्या दिवशी सजावर येतात. त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी थाटलेल्या खाजगी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे रामनगर ते जालना पंधरा किलोमीटर अंतर असून आपले शेतातील कामे सोडून तर मोलमजुरी करणाऱ्यांना रोजनदारीचे कामे सोडून चकरा माराव्या लागत असल्याने दुहेरी भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, सध्या जालना शहरात महसूल जमा करण्याचे काम सुरु असून हे काम संपल्यावर मार्चनंतर नियमित कार्यालय सुरु राहील, असे तलाठी बी. बी. कळकुंबे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...