आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कुंभार पिंपळगाव सज्जाचा तलाठी 10  हजारांची लाच घेताना अडकला जाळ्यात

कुंभार पिंपळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमीन आईच्या नावे करण्यासाठी १० हजार रुपयांची स्वीकारताना कुंभार पिंपळगाव सजाच्या तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.

शिवहार जगन्नाथ तमशेट (४८) असे त्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे कुंभारपिंपळगाव येथे शेतजमीन आहे. वारसा हक्का प्रमाणे ती आईच्या नावे करण्यासाठी तलाठी शिवहार तमशेट यांनी १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...