आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:स्नेहसंमेलनातून कलागुण प्रकाशात येतात

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेले गायक, संगीत, अभिनय, अशा विविध गुणांना स्नेहसंमेलनातून प्रकाशझोत मिळत असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल यांनी केले.

जालना शहरातील अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल येथे “जय महाराष्ट्र” या वार्षिक स्नेहसंमेलाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी शाळेचे अध्यक्ष बनारसीदास जिंदल, संचालक जयभगवान जिंदल, पी. सुरेश, ॲड. महेश धन्नावत, डॉ. सुजाता नानावटी, डॉ. उदय अन्नापुरे, भगवद्गीतेचे युवा अभ्यासक तुलजेश चौधरी, प्राचार्या शुभ्रा वर्मा यांची उपस्थिती होती.

संगीता गोरंट्याल यांनी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलने राष्ट्रीय पातळीवर जालन्याचे नाव उंचावले ही बाब भूषणावह असल्याचे नमूद करत आ. कैलास गोरंट्याल यांनी निधोना रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन रोहित शर्मा यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य, गायन, एकांकिका सादर करून मने जिंकली.

बातम्या आणखी आहेत...