आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात मराठवाड्यातील देगलूर जि. नांदेड येथे प्रवेश करून ही यात्रा महाराष्ट्रात ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या पदयात्रेत जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन येथील प्रमुख पदाधिकारी बैठकीत केले आहे.
ही यात्रा मराठवाड्यातील देगलूर ते विदर्भातील जळगाव जामोद पर्यंत ७ ते २० नोव्हेंबर २०२२ चालणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ठरवून दिल्याप्रमाणे १६ नोव्हेंबर रोजी वाशीम येथे सकाळी ६ : ३० वाजता जालना जिल्ह्यातील काँग्रेसच्या आजी -माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहुन सहभागी व्हावे असे ते यावेळी म्हणाले. या बैठकीला तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष एजाज पठाण, माजी उपनगराध्यक्ष रिझवान शेख, गटनेते संतोष अन्नदाते, श्रावण आक्से, नासेर शहा, रफीकोदीन शेख, कन्हैयालाल बिरसोने, गणेश आक्से, अजीम पार्टी, महसुद सोदागर, साहेबराव बारोकर, शेख नजीर, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सोपान सपकाळ, अनिल पगारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.