आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:तांदुळवाडी खुर्द रस्त्याचे काम निकृष्ट; कारवाई न झाल्यास टाळे ठोकणार

तांदुळवाडीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तांदुळवाडी गावाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एक वर्षापुर्वी झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असल्याने ग्रामस्थांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत असल्याने संबंधीत ठेकेदार व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता तेजराव म्हस्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व सर्व रस्त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंचासह सदस्य, ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, तांदुळवाडीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एक वर्षापुर्वी झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. संबंधीत ठेकेदाराने उपअभियंताने संगनमत करुन बोगस कामाचे देयके उचलली आहेत. सदर काम हे बोगस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायतीने वारंवार काम करण्याची विनंती करुनही दुर्लक्ष करण्यात आले. संबंधितावर कारवाई न झाल्यास प्रधानमंत्री सडक योजनेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा सरपंच मायाताई चित्तेकर, उपसरपंच अण्णासाहेब निकाळजे, आण्णासाहेब चित्तेकर, संघप्रिया शिंदे, संतोष घडे, दिलीप खरात, सुनिताबाई कापसे, शिवकन्या हेलगे यांच्यासह आदींनी या निवेदनाद्वारे दिला आहे.