आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड ते मनमाड या मराठवाडा मार्गावर मंगळवारी सेलू ते परतूर दरम्यान रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला. दरम्यान, मंगळवारी या मार्गावर तपोवन, नरसापूर - नगरसोल, नांदेड - मुंबई तसेच सचखंड एक्सप्रेस या गाड्यांना दीड ते दोन तासांचा विलंब झाला. यामुळे नांदेड ते जालना येणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. नांदेड जाणारी तपोवन एक्सप्रेस ही दुपारी २ वाजेदरम्यान येते ही गाडी ३ वाजता आली. नरसापूर ही नगरसोल येथून येणारी गाडी ३ वाजता येते ४ वाजता आली होती.
या बराेबर मुंबईकडे नांदेड - मुंबई येणारी १ वाजता दोन नंतर आली. तर दिल्लीकडे जाणारी १२ पर्यंत सचखंड १ वाजता जालना स्थानकावर दाखल झाली. दुपारनंतर जालना स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. सध्या सैलानी यात्रा सुरू असून हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहे. मंगळवारच्या ब्लॉकमुळे भाविकांची मोठी तारांबळ झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.