आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेची घंटा वाजली:प्रथम प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांची ताशाचा गजर, तुतारीच्या निनादात मिरवणूक; पुष्प, मिठाई वाटप करून स्वागत

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या शैक्षणिक वर्षाला १३ जूनपासून प्रारंभ झाला असला तरी विद्यार्थ्यांना आज १५ जूनपासून प्रवेश देण्यात आला. पहिल्याच दिवशी विविध गावात ढोल-ताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत करुन गुलाबपुष्प देऊन पेढे वाटप करण्यात आले. तसेच मोफत पुस्तके वाटप करण्यात आली.

पाथ्रुड तांडा शाळेत मिठाई सिंधी काळेगाव । जालना तालुक्यातील पाथ्रुड तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वप्रथम प्रवेश पात्र मुलांना मिठाई तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी सरपंच धनू गायके यांची उपस्थिती होती. शाळा प्रवेश उत्सव व शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. प्रारंभी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्यात आली. तसेच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गोड भात वाटप करण्यात आला. या मेळाव्यात मोफत गणवेश, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शालेय धोकादायक इमारती आदी विषयावर चर्चा करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी आंबा, चिंच, लिंब, बोरी आदी बियांचे संकलन करण्यात आले. या वेळी सरपंच धनू गायके, कंेद्रप्रमुख भागवत जेटेवाड, गोरख राठोड, तुळसाबाई राठोड, ज्योती राठोड, गणेश राठोड, मुख्याध्यापक नारायण माहोरे आदी उपस्थित होते

संस्कार प्रबोधिनी विद्यालय
जालना । येथील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पारंपरिक मंगलवाद्यांनी पहिल्याच दिवशी सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्यात आले. सकाळीच शाळेच्या प्रांगणात भव्य रांगोळी, इमारतीची वेगवेगळ्या पुष्पांनी सजावट करण्यात आली होती. अनोख्या पद्धतीने केलेल्या स्वागतामुळे विद्यार्थी भारावले होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव विजय देशमुख, मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी केले होते. शिक्षक किरण धुळे, रेखा हिवाळे, कीर्ती कागबट्टे, शारदा उगले, माणिक राठोड, रशिद तडवी, पवन साळवे, नितेश काळे आदींची उपस्थिती होती.

मत्स्योदरी, पिंपरखेड
तीर्थपुरी । घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील मत्स्योदरी विद्यालयात महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत शालेय पुस्तकांचे बुधवारी वाटप करण्यात आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सभापती भागवत रक्ताटे, अशोक आघाव, श्रीपाद कंडारकर, उपसरपंच विष्णू रक्ताटे, आनंद भगत, मुख्याध्यापक हुलमुख, पडघन यांच्यासह पालक, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

पवार माध्यमिक विद्यालय
कुंभार पिंपळगाव । घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी लिंबी, मूर्ती, श्रीपत धामनगाव या गावात विद्यार्थी शाळा प्रवेश व शिक्षणाविषयी जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यालयात जुन्या व नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव-स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तौर, भूषणराव तौर, निलेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन भिमाशंकर शिंदे यांनी तर सुनील खरात यांनी आभार मानले. यावेळी पालक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

गणपती इंग्लिश स्कूल
भोकरदन । येथील श्री गणपती इंग्लिश/मराठी हायस्कूल व ज्यू कॉलेज, पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, स्व. अॅड. भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय जोमाळा येथे विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत शाळेच्या गेटपासून रॅली काढून पुष्पवृष्टी तसेच औक्षण व चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इंद्रजित देशमुख, प्राचार्य जे. आर. सपकाळे, आर. आर. त्रिभुवन, नागरगोजे, मनोज लेकुरवाळे, सोपान सपकाळ, जी. व्ही. जाधव, गजानन बुलगे, रशिद अन्सारी आदींची उपस्थिती होती.

मंठा तालुक्यातील शाळांत नवागतांचे उत्साहात स्वागत
मंठा । तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधून पहिल्याच दिवशी बुधवारी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले. बहुतांश शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच गुलाबपुष्पे आणि फुगे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील पांगरी खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या बालकांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश, पुष्पगुच्छ आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी गट समन्वयक काशीनाथ राठोड, केंद्रप्रमुख के. एम. धोत्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल शेंडगे, सदस्य तुकाराम शेंडगे, सरपंच विकास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तान्हाजी शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी शाळेत येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना शाळेविषयीची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांचे दोन वर्षाचे शैक्षणिक नुकसान भरून निघावे यादृष्टीने विशेष परिश्रम घेतले जाणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शालेय गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी व शालेय व्यवस्थापन समितीने अथक परिश्रम घेण्याचे आवाहन केले. पांगरी खुर्द शाळेचे मुख्याध्यापक मुख्तार अन्सारी यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भीमराव खरात, रमेश विसरूप यांनी परिश्रम घेतले.

डोंगरगाव प्राथमिक शाळा
बदनापूर । तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीत नवीन प्रवेशित होत असलेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संतोष देशपांडे, सहशिक्षिका एस. पी. महाजन, शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...