आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कल्याणकारी योजना बंद करणाऱ्या सरकारला धडा शिकवा; आमदार संतोष दानवे यांचे प्रतिपादन, जानेफळ पंडित हिवराबळी परिसरात विविध कामांचे लोकार्पण

जाफरबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा),अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,सारथी अशा विविध योजना राज्य सरकारने बंद केल्या व सर्व सामान्यांना अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत असुन येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवा व कायमचे घरी पाठवावे, असे आवाहन आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले.जानेफळ (पं)-हिवरा (बळी) ते खासगाव या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन तयार होत असलेल्या ९ किलोमिटर रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, विजय परिहार, संतोष लोखंडे, गोविंदराव पंडीत, भाऊसाहेब जाधव, राजेश चव्हाण, दगडूबा गोरे, साहेबराव कानडजे, जगन पंडीत, सुधीर पाटील, राजू साळवे, गजानन लहाने, लालसिंग देशमुख, कौसर शेख, राजू सरोदे, विजय बोराडे, रमेश पंडीत, गजानन सरोदे, प्रल्हाद लोखंडे, गणेश जाधव, विश्राम चव्हाण, अशोक पंडीत, डिगांबर पंडीत, भगवान गाढवे, शरद पंडीत, साहेबराव लोखंडे, प्रभाकर लोखंडे, रामदास लोखंडे, बाबुराव लहाने, भगवान जाधव, विष्णू तांबेकर यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. यावेळी जानेफळ (पं) येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जानेफळ (पं) - हिवरा (बळी)-खासगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे ६ कोटी ३०लाख रुपये, जिल्हा परिषद डी.पी.डी.सी योजनेच्या माध्यमातून जानेफळ (पं) ते हारपळा रस्त्याचे पुल बांधकामासह डांबरीकरण करणे १२ लाख रुपये, जिल्हा परिषद दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता ५ लाख रु, २५/१५योजने अंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम करणे ७ लाख रुपये अशा एकूण ६ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी तर हिवरा (बळी) येथे हिवरा (बळी) ते खासगाव व हिवरा (बळी) ते जानेफळ (पं) ९ कि.मी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ६कोटी ३० लक्ष रुपये,जाफ्राबाद-भोकरदन रोड वरील हिवरा (बळी) फाटा- हारपळा-हिवरा (बळी) ४ कि.मी रस्त्याचे पुलासहित डांबरीकरण व मजबुतीकरण करणे ४कोटी ५० लाख रुपये,२५/१५योजने अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे ७ लाख रुपये, रानमळा वस्ती येथे नवीन सिंगल फेज डीपी ७ लाख रुपये, दगडवाडी वस्ती येथे नवीन सिंगल फेज डिपी ७ लाख रुपये, जिल्हा परिषद दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्ता ५ लाख रुपये, अशा एकूण १० कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...