आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव:राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिनींना शिक्षकी अनुभव

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका लतिका मनोज उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रेवती मांटे, सचिव प्रो. डॉ. सुखदेव मांटे, वरूण अंबेकर, एलीया गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. आज संपूर्ण शाळेचे नियोजन विद्यार्थ्यांनी सांभाळले व शिक्षक बनून विद्यार्थ्यांना अध्यापन केले व शिक्षकांनी वर्गात बसून त्यांचे अध्ययन ग्रहण केले. यावेळी अपर्णा भंडारे, सोनाली खंदारे, मोहिनी श्रीवास्तव, रवींद्र गिरे, महेंद्रसिंग परदेशी, रेणुका पळसकर, अलकनंदा घुले, रेखा शेळके, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, मंगला नागरे, गणेश कायंदे, राजू काकड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...