आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:भारत ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना संचालित, भारत जुनियर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त हे होते, तर प्रशासकीय अधिकारी कानुप्रिया देवलियाल, प्रा. डॉ. रत्नाकर कुलकर्णी, प्रा. डॉ. शाम काबुलीवाले, प्रा. गजानन जगताप, प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कान्हेरे, प्राचार्य विजय अदनाक, प्राचार्य राहुल तायडे, मुख्याध्यापिका शिल्पा पाटील, मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शाळा विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या विषयी माहिती सांगीतली. तसेच यावेळी प्रशासकीय अधिकारी कानुप्रिया देवलीयाल म्हणाल्या की, शिक्षक हा देशाचा भावी नागरिक घडविणारा शिल्पकार असतो. शिक्षकाच्या अखंड ज्ञानसागरातून विद्यार्थ्यांना बहू अंगी जीवनकौशल्य आत्मसात करून जगण्याची माहिती देत असतो. तसेच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याही जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रामेश्वर मानधना, प्रा. किशोर घोरपडे, प्रा. सुनीता राऊत, प्रा. कल्पना पाटील, प्रा. घुगे, प्रा. जयंत देशमुख, प्रा. एस. पी. जाधव, प्रा. मनीषा राऊत, प्रा. वर्षा पालकर, प्रा. कृष्णा चव्हाण, संदीप राठोड, संजय चौरे, संतोष पाठक, विकास सरोदे, प्रशांत वायकोस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामेश्वर मानधना यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कान्हेरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...