आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन:अठ्ठावीस जिल्ह्यांतील शिक्षकांना मिळाले नाही दिवाळीपूर्वी वेतन

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपूर्वीच शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ आठ जिल्ह्यांसाठी मर्यादित राहिला. ३६ पैकी २८ जिल्ह्यांतील शिक्षकांच्या हाती वेतन आले नाही. कारण शासनाने १०० टक्के निधीच दिला नाही.

शिक्षक आणि शिक्षकेतर ‍कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याचा निर्णय १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला होता. पण त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आली नाही. राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषद यासह खासगी अनुदानित शाळांमधील वेतन अनुदान जिल्हास्तरावर वर्ग करताना जवळपास ५० ते ६० टक्के रक्कम पाठवली गेली. यामुळे दिवाळी वेतन अदा करणे शक्य झालेले नाही, असे प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू यांच्यासह अमोल तोंडे, संजय हेरकर, बी. आर काळे, दत्तात्रय पुरी, योगेश झांबरे आदींनी निदर्शनास आणून दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा, नागपूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर या जिल्ह्यांतील शिक्षकांचे वेतन जुन्या तरतुदीत शिल्लक रक्कम अदा करण्यात आले आहे, तर बीड, वाशिम, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांतील शिक्षकांचे वेतन प्राप्त तरतुदीनुसार काही तालुक्यांचेच वेतन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...