आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा बंद:शिक्षक इलेक्शन ड्यूटीवर;  शाळा दोन दिवस बंद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक ग्रामपंचायतीच्या इलेक्शन ड्यूटीवर असल्याने शनिवार व सोमवार हे दोन दिवस शाळा बंद राहिल्याची घटना जालना तालुक्यातील सोमनाथ येथे घडली. याप्रकरणी ग्रामस्थांनी शिक्षकांना फोन करून विचारले असता तहसीलदारांच्या आदेशानुसार इलेक्शन ड्यूटीला जावे लागले, अशी माहिती शिक्षकांनी गावकऱ्यांना दिली.

ग्रामस्थ व शिक्षकांच्या या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सोमनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत दोनच शिक्षक असल्याने हा प्रकार घडला आहे. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने नेहमीच हा प्रश्न उद्भवत आहे.

बातम्या आणखी आहेत...