आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरमहाविद्यालयीन कबड्डी (मुले) स्पर्धा बदनापूर येथे दोन दिवस पार पडली. यामध्ये विद्यापीठ संलग्नित २० महाविद्यालयांतील क्रीडापटूंनी सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात बदनापूर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कन्नडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाच्या संघावर ३१ गुणांनी मात केली. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कबड्डी स्पर्धा मॅटवर घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व निर्मल क्रीडा व समाजप्रबोधन ट्रस्ट संचालित बदनापूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन कबड्डी (मुले) स्पर्धा पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ११ व १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. उद्घाटन जालना जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, औरंगाबाद क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे उपस्थित होते. आयोजक संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. १२ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना बदनापूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व कन्नड येथील शिवछत्रपती महाविद्यालय संघांदरम्यान झाला. बदनापूर संघाने ३७ गुण मिळवले, तर कन्नड संघाने १४ गुण मिळवले असता बदनापूर संघाने २३ गुणांनी विरोधी संघावर मात करीत प्रथम विजेता ठरल्याचे पंचांनी घोषित केले. डॉ. एम. डी. पाथ्रीकर, डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या डॉ. शेख एस. एस., डॉ. खान नाजमा, डॉ. एस. डी. लांडे यांनी आयोजन केले होते.
इनडोअरमध्ये मॅटवर पार पडल्या कबड्डी स्पर्धा
बदनापूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियममध्ये ११ व १२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी (मुले ) स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना बदनापूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच कन्नड येथील शिवछत्रपती महाविद्यालयात झाला. प्रथम व द्वितीय आलेल्या संघांना पालकमंत्री डॉ. अतुल सावे तसेच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते सत्कार करून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.