आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:विद्यार्थ्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

टेंभुर्णी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन या जिल्हा परिषद शाळेत बारा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या स्वीटी तुले या शिक्षिकेची नुकतीच जिल्हा बदली झाली. त्या निमित्ताने शिक्षकदिनी ग्रामस्थ व शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. या हृदयीस्पर्शी निरोप समारंभात विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

बारा वर्षे अध्यापन करताना विद्यार्थी प्रिय झालेल्या शिक्षिका तुले यांची मध्यंतरी बदली झाल्यानंतरही गावकऱ्यांनी त्यांची बदली रद्द करून त्यांना तपोवन येथील जिल्हा परिषद शाळेतच कार्यरत ठेवले. मूळच्या नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तुले जाफराबाद तालुका येथील तपोवन गोंधन येथे शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या होत्या. दरम्यान, नुकतीच त्यांची नागपूर जिल्ह्यात बदली झाली आहे.

स्वजिल्ह्यात (नागपूर) बदली झाल्याने शिक्षकदिनी शाळा आणि ग्रामस्थांतर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या भावनिक कार्यक्रमात हसू आणि आसू या दोघांचाही सुरेख संगम दिसून आला. यावेळी सरपंच अंजना फलके, शाळा समिती अध्यक्ष मधुकरराव शिंदे, उपाध्यक्ष विष्णू फलके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. ए. देठे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजीराव फलके, उपाध्यक्ष रामू चौधरी, मुख्याध्यापक पी. टी. तळेकर, माजी अध्यक्ष दमोता फलके, बालाजी फलके, माधव डोमाळे, बाळू हिवाळे, मधुकर फलके, अनिल फलके, राजू फलके, दिनेश फलके, विशाल फलके, शिक्षक सुखदेव चेके, सुलभा गायकवाड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नसीम शेख यांनी केले.़

शिक्षकांची प्रतिमा विद्यार्थ्यांमुळे
शिक्षकांची प्रतिमा विद्यार्थ्यांमुळे असते. विद्यार्थी आहे तर शिक्षक आहे म्हणून शिक्षकांप्रति मुलं जो आदर दाखवतात तोच खरा सन्मान आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात दिसणारा आदर शिक्षकाच्या मनाला भावतो. शिक्षकदिनी मुलांकडून मला भरभरून प्रेम मिळाले त्यांना माझा देण्याचा वाटा होता पण त्यांच्यात घेण्याची प्रवृत्ती असल्याने विद्यार्थ्यांचे जीवनमान चांगले होते याचा मला आनंद आहे.- स्वीटी तुले, शिक्षिका, तपोवन गोंधन.

बातम्या आणखी आहेत...