आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जालना शहरात शुक्रवारपासून तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मिटकॉन प्रशिक्षण केंद्र जालना यांच्या वतीने जालना येथे ११ नोव्हेंबर २०२२ पासून चार आठवडे कालावधीत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात युवक व युवतींसाठी स्वत:चा उद्योग/व्यवसाय उभारणीसाठी व कर्ज प्रकरण करण्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग अंत्यत महत्त्वाचा राहणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) व विद्युत वाहणे(इलेक्ट्रीकल व्हेअकल) या बाबतीत थेरी व प्रात्येशिकासह विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन राहणार आहे.

या प्रशिक्षणात मशिनरी हाताळणे, सोलर एनर्जी प्लेट तयार करणे, कच्चा माल, साहित्य, कॅपीसिटी, जोडणी व विक्रीव्यवस्था तसेच विद्युत वाहणे तयार करण्यासाठी लागणारे मशिनरी, साहित्य, राॅमटेरियल, प्रमाणीत बॅटरी व उपलब्ध प्लॅन्ट या सोबत उद्योग संधी मार्गदर्शन, उद्योग प्रेरणा, संघटन कौशल्य, उद्योजकीय गुणसंपदा, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, व्यवस्थापन, जागेची निवड, बाजारपेठ, शासकीय व निमशासकीय योजना, जिल्हा उद्योग केंद्राची योजना, खादीग्राम उद्योगांची योजना, महामंडळाच्या विविध योजना, प्रकल्प अहवाल, बॅंकेची कार्यप्रणाली, विक्री व्यवस्था, भांडवल उभारणी, मनुष्यबळ, विमा संरक्षण, शासकीय परवाने, प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी बाबतीत तज्ञ प्रशिक्षक, वरिष्ठ अधिकारी व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहिती व प्रवेश अर्जासाठी के. डी. दांडगे, जिल्हा प्रकल्प अधिकारी,मिटकाॅन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...