आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आग:बदनापुरातील तहसील कार्यालयाला भरपावसात लागली आग, महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक 

बदनापूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पहाटे 3 वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अनेकांच्या घराला पाण्याच्या धारा लागल्या तर दुसरीकडे तहसील कार्यालयात निवडणूक विभागाला आग लागली. बघता बघता आगीने पेट घेतल्याने या विभागातील निवडणूक अभिलेखे जळून खाक झाले आहेत. ही घटना पहाटे 4 वाजता घडली. कोषागार कार्यालयात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्याने तातडीने अग्निशामक दलास पाचारण करून आग विझविण्यात आली. या विभागात मागील 15 वर्षाचे निवडणूक रेकॉर्ड होते.

बदनापूर तहसील कार्यालयात असलेल्या निवडणूक विभाग खोलीतून अचानक धूर निघू लागला. हे कोषागार कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. सदर कर्मचाऱ्याने पाठीमागून जाऊन बघितले असता आग लागल्याचे दिसून आल्याने तातडीने त्या कर्मचाऱ्याने तहसीलदार छाया पवार व अग्निशामक दलास माहिती दिली.

बदनापूर तहसील कार्यालयात आग लागल्याची माहीती मिळताच तहसीलदार छाया पवार,नायब तहसीलदार संजय शिंदे,दळवी,समद फारुकी,मंडळ अधिकारी पाउलबुद्धे,तलाठी सुनील होळकर यांनी तहसील कडे धाव घेतली दरम्यान 5 वाजता अग्निशामक दलाची तुकडी पोहोचली. आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले असता काही मिनिटात आग आटोक्यात आली. मात्र या विभागात असलेले मागील 15 वर्षाचे विधानसभा,ग्राम पंचायत, पंचायत समिती निवडणुकीचे कागदपत्रे जळून खाक झाले.

बातम्या आणखी आहेत...