आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:तीर्थपुरी व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी टेकाळे‎

तीर्थपुरी‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या‎ प्रमुख उपस्थितीत रविवारी तीर्थंपुरी‎ येथील शिवतीर्थ लॉन्सवर घेण्यात‎ आलेल्या बैठकीत तीर्थपुरी येथील‎ व्यापारी महासंघाची नवीन‎ कार्यकारिणीची निवड करण्यात‎ आली. यात तीर्थपुरी शहर व्यापारी‎ महासंघाच्या अध्यक्षपदी दत्ता‎ टेकाळे यांची व महिला आघाडी‎ अध्यक्षपदी शारदा अंकुशराव बोबडे‎ यांची निवड करण्यात आली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎

उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष‎ रामप्रसाद चिमणे, सचिव किशोर‎ तोष्णीवाल, सहसचिव राहुल‎ चिमणे आदी निवड करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आल्याचे व्यापारी महासंघाचे‎ जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी या‎ बैठकीत जाहीर केले. तीर्थंपुरी‎ शहराचे मावळते अध्यक्ष संतोष‎ बोबडे, माजी अध्यक्ष अंकुशराव‎ बोबडे यांचा जिल्हा कार्यकारणीत‎ समावेश करण्यात आला. यावेळी‎ सुखदेव बजाज, आनंदी अय्यर,‎ नरेंद्र जोगड, भाजप तालुकाध्यक्ष‎ शिवाजीराव बोबडे, रमेशचंद्र‎ बोबडे, परमेश्वर बोबडे, संभाजी‎ कळकटे, उदय उढाण, प्रताप काळे,‎ रामेश्वर मोरे, गणेश बोबडे, उमेश‎ लोहिया, सतीश तापडिया, संदिप‎ कोरडे, मनिश उढाण, गोविंद‎ बोबडे, अशोक बोबडे आदींची‎ उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...