आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा‎:टेंभुर्णी जि.प. शाळेत सेवानिवृत्तिपर सोहळा‎

टेंभुर्णी‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी‎ केंद्रांतर्गत दत्तनगर जि.प. शाळेचे‎ उपक्रमशील शिक्षक जि. आर.‎ भिताडे हे मंगळवारी सेवानिवृत्त‎ झाले. त्यानिमित्त त्यांचा दत्तनगर‎ शाळा व टेंभुर्णी केंद्रातर्फे गौरव‎ करण्यात आला. यावेळी शाळेतील‎ चिमुकल्यांनी जेंव्हा आपल्या‎ गुरूजीला भेटवस्तू देवून त्यांचा‎ गौरव केला त्यावेळी वातावरण‎ भावूक बनले होते. ग्रामपंचायत व‎ शाळा व्यवस्थापन समितीतर्फे‎ देखील भिताडे यांना भेटवस्तू देवून‎ गौरविण्यात आले. या निरोप समारंभ‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच‎ गौतम म्हस्के हे होते.

तर प्रमुख‎ अतिथी म्हणून शिक्षण विस्तार‎ अधिकारी राम खराडे, सेवानिवृत्त‎ शिक्षण विस्तार अधिकारी सखाराम‎ नवले, शाळा व्यवस्थापन समिती‎ अध्यक्ष योगेश गडकर, उपाध्यक्ष‎ संदीप भागवत, संजय गांधी निराधार‎ समिती सदस्य किशोर कांबळे,‎ शिक्षणतज्ज्ञ रमेश भाले, मीरा‎ भिताडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक‎ आर.डी. लहाने, डी.ए. देठे, मधुकर‎ मुंढे, आदर्श शिक्षक शेख जमीर,‎ केंद्रीय मुख्याध्यापक मुरलीधर‎ वायाळ आदींची प्रमुख उपस्थिती‎ होती. यावेळी अनेक शिक्षकांनी‎ आपल्या भाषणातून शिक्षक भिताडे‎ यांच्या सेवा कार्याचा गौरव केला.‎

सर्व सहकारी शिक्षक व‎ विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच आपण‎ ३२ वर्ष यशस्वी सेवा करू शकलो‎ अशा भावना यावेळी भिताडे यांनी‎ व्यक्त केल्या. सूत्रसंचालन नसीम‎ शेख यांनी केले तर प्रास्ताविक‎ मुख्याध्यापिका मीना जामदार यांनी‎ केले कार्यक्रमासाठी दत्तनगर‎ शाळेच्या मुख्याध्यापिका मीना‎ जामदार, शिक्षिका संध्या लोखंडे,‎ उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका‎ आरेफा खान कार्यक्रमाला भिताडे‎ यांची कन्या शिवगंगा भिताडे, मुले‎ आकाश व वैभव यांच्यासह अंतर्गत‎ शाळेचे मुख्याध्यापक महेश आहिरे,‎ रमेश साळवे, भगवान मांटे, पंजाब‎ दांदडे, राजू दंदाले, प्रुथ्वीराज‎ तळेकर, दिलीप आढे, मंगेश वाणी‎ आदिंसह शिक्षक, शिक्षिका व‎ ग्रामस्थांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...