आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:आसवांना बोलते करणारा टेंभुर्णीचा ‘अबोल कवी’ आकाश

चैतन्य राऊत | टेंभुर्णी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रुरनितीने बालपणीच त्याचे चालणे बोलणे हिरावले, परंतु मनातील संवेदनांना मोबाईलच्या कीपॅड वर कवितांच्या सुंदर भावनांना शब्दरूप करीत विविध अंगी कविता लिहिणाऱ्या टेंभुर्णी येथील दिव्यांग कवी आकाश देशमुख यांच्या कवितांचा श्वास कविता ध्यास कविता या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा टेंभुर्णी येथील जेबीके विद्यालयात संपन्न होत आहे. साहित्यिक डॉ. सुहास सदावर्ते यांनी या कवितांचे संपादन करून हा काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीस आणला आहे

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी या दिव्यांग कवीला भेटण्यासाठी टेंभुर्णी आले असता त्यांनी चित्तरलेल्या कविता सर्वांच्या मनाला भावून गेल्या. ऐन बालपणात मनावर कोरलेली वेदनेची शिदोरी घेत आयुष्याकडे पाहणारा, परिस्थितीवर मात करीत ‘ हे, जीवन सुंदर आहे ! असा आशावाद मांडणारा दिव्यांग कवी आकाश देशमुख याची स्वप्नवत असलेली कवितासंग्रह प्रकाशानाची इच्छा कथा मालेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण केली.

कवितासंग्रहात ९४ कविता असून कवी आकाश देशमुख याच्या मनातले भावतरंग,जगण्याचे वास्तव आलेले अनुभव, आईवडिलांचे अपार कष्ट, स्वताचा जगण्याचा चाललेला ध्यास अशा विविध विषयांवरील कविता कवितासंग्रहात आहेत. शेती, शेतकरी जीवन, सैनिक,कष्टकरी, सामान्य माणूस हा आकाशच्या कवितेचा विषय होता. कवितासंग्रहात पाऊस, वेदना, बासरी, मैत्री, आषाढी वारी, तिरंगा, श्रावण महिना, वीर जवान, बालपण, देव, प्रियकर, प्रेयसी,विरह, प्रेमाच्या आणाभाका, बासरी,ओढ, अनावर आठवण अशा विषयांवरील कविता वास्तवाचे भान जपायला लावतात. कवितासंग्रहासाठी साने गुरुजी कथामालेच्या कल्पना हेलसकर, आर. आर. जोशी, जमीर शेख, संतोष लिंगायत, डाॅ. दिगंबर दाते, संजय निकम, प्रा.दत्ता देशमुख, पवन कुलकर्णी, संदीप इंगोले, रामदास कुलकर्णी, डॉ. यशवंत सोनुने, कैलास गाडेकर यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...