आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोडत:भोकरदनमध्ये महिलांसाठी दहा प्रभाग; तर परतुरात सर्वसाधारण वर्गासाठी 12 जागा

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदांसाठी प्रभागातील आरक्षण सोमवारी काढण्यात आले. वार्ड आरक्षणामुळे राजकारण्यांचे गणित बदलले. कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती झाली. दरम्यान, आरक्षणातून महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. भोकरदनसाठी दहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवले तर परतूरसाठी १२ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले.

भोकरदन न.प.तील १० प्रभाग महिलांसाठी आरक्षित
नगर परिषद भोकरदन सार्वत्रिक निवडणुक वर्ष २०२२ साठी सोमवारी दुपारी ३ वाजता नप च्या नवीन मंगल कार्यालयात आध्यासी अधिकारी, तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक जालना, ज्ञानोबा बाणापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिलासाठी च्या प्राभाग, आरक्षणाची लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली.

भोकरदन नपच्या एकूण २० प्रभागा पैकी १० प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले. चिठ्ठी काढून आरक्षित झालेले व सर्वसाधारण राहिलेले प्रभाग या प्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक १ अ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव, प्रभाग क्रमांक एक ब अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन अ सर्वसाधारण महिला ,प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ अ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक चार ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पाच अ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ६ अ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक सात अ सर्वसाधारण महिला ,प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक आठ अ अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक ८ ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ अ, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९ ब सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक १० अ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १० ब सर्वसाधारण, प्रमाणे एकूण वीस प्रभागासाठी चे आरक्षण व सर्वसाधारण प्रभाग जाहीर करण्यात आले आहे.

भोकरदन नगरपरिषदेच्या नवीन मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता निशांत साळवे, हर्षल साळवे, वैभवी येवले या लहान मुलांच्या व मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग जालना ज्ञानोबा भानापुरे यांना भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक व्ही. जी. आडे, गणेश बैरागी, समीर बेग, विश्वजीत गवते, कैलास जाधव, सोमीनाथ बिरारे या कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले.

बातम्या आणखी आहेत...