आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशेष रस्ता अनुदान योजना निधी सन २०२१-२२ अंतर्गत अंबड शहरामध्ये विविध ठिकाणी सीसीट्रिमिक्स रस्ता बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक, स्टॅम वॉटर ड्रेन व अानुषंगिक कामांच्या टेंडर प्रक्रियेमध्ये होत असलेल्याअनियमितेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून सदर टेंडर प्रक्रिया मॅनेज नव्हे तर स्पर्धात्मक पध्दतीने पार पाडावी नसता न्यायालयीन तसेच लोकशाही पध्दतीने आंदोलन करुन लढा दिला जाईल, असा इशारा देण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, अंबड नगर परिषदने शहरातील विविध रस्त्यांच्या कामाबाबत तत्कालीन पालकमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या प्रयत्नातून अंबड शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून विशेष रस्ता अनुदान योजना निधीत विविध ठिकाणी सी.सी. ट्रिमिक्स रस्ता बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक, स्टॅम वॉटर ड्रेन व अानुषंगिक कामे करणे अपेक्षित आहेत.
सदरील कामे दर्जेदार व पारदर्शक पध्दतीने व्हावेत ही अपेक्षा नागरिकांना आहे. सदरील कामांसाठी नगर परिषद अंबड यांनी टेंडर प्रसिध्द केले होते, सदरील टेंडर प्रक्रियामध्ये एकूण ६ एजन्सीजने भाग घेतला होता. यापैकी तीन तीन एजन्सीने एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन मॅनेज पध्दतीने टेंडर भरलेले आहे तर उर्वरीत ३ एजन्सीने स्पर्धात्मक पध्दतीने टेंडर भरले होते. परंतु ई-निवीदा समितीने तांत्रिक छाननीत ज्या एजन्सीने स्पर्धात्मक पध्दतीने टेंडर भरले होते. त्या एजन्सीला अपात्र केले आहे. त्यामुळे सदरील टेंडर प्रक्रियेची चौकशी करुन सदर टेंडर नव्याने प्रसिध्द करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अफरोज पठाण, समद बागवान, अर्जुन भोजने, शिवप्रसाद चांगले, कैलास भोरे, योगिता टकले, मंदाकिनी दिलपाक, वैशाली कोटंबे, प्रकाश नारायणकर, सलिम बागवान, फेरोज पठाण, राहुल खरात आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.