आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी नीतीवर ठाकरे सरकारची वाटचाल सुरू; माजी राज्यमंत्री खोतकर यांचे प्रतिपादन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या पाठीवर चिरकाल स्मरणात राहील असे प्रजाहितदक्ष राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. तोच लोककल्याणकारी वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जोपासत असून लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यात सरकारची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अ. भा. मराठा महासंघ व राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. आमदार कैलास गोरंट्याल, समितीचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे, प्रा. सोपान तेलगड, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, समितीचे मार्गदर्शक तथा अ. भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राम गव्हाणे, संतोष जेधे, संतोष गाजरे, डॉ. धनसिंह सूर्यवंशी, भरत मानकर, फेरोज अली, पो. नि. अजहर सय्यद, ज्ञानेश्वर पायघन, यादव राऊत, अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, ॲड. शैलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले, सर्व जाती-धर्मीयांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी पारदर्शक राज्यकारभाराची नीती अवलंबली.

गुन्हेगारांबाबत भेदभाव केला नाही, असे सांगून जिल्हा परिषद कार्यालय परिसरात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत समिती अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या मागणीची पूर्तता केली जाईल, असे वचन माजी मंत्री खोतकर यांनी दिले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी या भागास छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे संबोधले जावे, यासाठी आपण केलेल्या विनंतीस परिसरातील व्यापारी, नागरिकांनी प्रतिसाद दिला असून पुतळा परिसरात हायड्रॉलिक शिडी लवकरच बसवण्यात येईल, असे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले. अरविंद देशमुख यांनी जालना जिल्ह्यातील बरेच मावळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर गेले असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्रानुसार आम्ही जालन्यात सर्वांना सोबत घेऊन हा सोहळा साजरा करत असल्याचे स्पष्ट केले.

प्रास्ताविकात अशोक पडूळ यांनी कोरोना परिस्थितीनंतर मोठ्या स्वरूपात सोहळा होत असल्याचे सांगितले. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष कऱ्हाळे यांनी केले, तर ॲड. शैलेश देशमुख यांनी आभार मानले. या वेळी शेख इब्राहिम, सुभाष चव्हाण, बालाजी माने, बाळासाहेब देशमुख, रोहिदास गंगातिवरे, प्रशांत तेलगड, आकाश जगताप, विजय वाढेकर, दत्तात्रय कपाळे, संतोष चाळसे, ॲड. सुजित मोटे, मंगेश मोरे, कमलेश काथवटे, चंद्रकांत भोसले, योगेश गरड, रविकुमार सूर्यवंशी, रवी खरात, निर्मल, राधेश्याम पवळ, उमेश गव्हाणे, कैलास दांडगे, राजीव दळे यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारावा
जिल्हा परिषद कार्यालय परिसरात सामाजिक न्यायाचे उद्गाते, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी केली. समितीतर्फे राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमाला घेणार असल्याचेही निकाळजे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...