आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रम:धन्यवाद मोदी अभियान जालना शहरात बैठक ; माजी आमदार नरेंद्र पवार असणार उपस्थित

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धन्यवाद मोदीजी या अभियानाचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा भटके विमुक्त्‍ आघाडीचे प्रभारी संजय केनेकर व महाराष्ट्र भटके विमुक्त्‍ आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार हे पदाधिकाऱ्यांसह जालना दौऱ्यावर आहे. त्या अंतर्गत ५ नोव्हेबर रोजी ते जालना येथे येणार आहे.

२ आक्टोबर ते १५ नोव्हेबर धन्यवाद मोदीजी हा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला त्यानिमित्ताने “ धन्यवाद मोदीजी”या आशयाचे पोस्ट कार्ड लाभार्थ्यांच्या मार्फत मोदी जी यांना पाठवण्यात येणार आहे. या विषयीचा आढावा ते घेणार आहेत. ५ नोव्हेंबर रोजी विश्रामगृह ४८८ येथे जालना येथे येणार असुन ते दिवस भर भाजपाचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व जिल्हा पदाधिकारी यासह सर्व आघाडी च्या पदाधिकाऱ्यांना भेटुन आढावा घेणार आहेत. त्यांच्या सोबत भटके विमुक्त आघाडी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उज्वला हाके, महामंत्री अशोक चौरमुले, गोविंद गुंजाळकर, मराठवाडा महिला अध्यक्षा डॉ. उज्वला दहिफळे, मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...