आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:बलात्कार प्रकरणातील‎ आरोपी अजूनही फरार‎

परतूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात काम करत असताना एका‎ जणाने महिलेवर अत्याचार केल्याची‎ घटना १ एप्रिल रोजी परतूर‎ तालुक्यातील एका गावात घडली‎ आहे. या प्रकरणी पीडीतेच्या‎ फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ वकिल दासु आढे असे संशयित‎ आरोपीचे नाव असून तो फरार आहे.‎ पीडित महिला शेतात एकटी बैल‎ चारण्यसाठी घेवुन गेली असता दुपारचे‎ एक वाजेच्या सुमारास वकील आढे हा‎ तेथे आला. त्यावेळी त्याने पिण्यासाठी‎ पाणी मागण्याच्या बहाण्याने पीडितेशी‎ जबरदस्ती केली. यासंदर्भात वाच्यता‎ केल्यास कापून टाकण्याची धमकी‎ दिली. यावेळी आरोपीने पीडित‎ महिलेच्या गळ्याला चाकूही लावला.‎ या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.‎

तो पेशाने वकील नव्हे, तर नाव‎ वकील : महिलेवर अत्याचार‎ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला‎ हा आरोपी पेशाने वकील नसून त्याचे‎ नाव वकील आहे. तो खासगी‎ वाहनावर वाहन चालक म्हणून काम‎ करतो. वकील दासू आडे हे त्याचे नाव‎ असून तो सध्या फरार आहे पोलिस‎ त्याच्या मागेवर असून लवकरच त्याला‎ अटक करतील, अशी माहिती परतुर‎ ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामसुंदर‎ कवठाळे यांनी दिव्य मराठीशी‎ बोलताना सांगितले.‎