आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:पोलिस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, जालन्यात आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्यात दुसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या आरोपीवर उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
ठाण्यात दुसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या आरोपीवर उपचार सुरू आहेत.

एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला सदर बाजार पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले. दरम्यान, रविवारी त्या आरोपीला चौकशीसाठी ठाण्यात नेले असता कर्मचाऱ्याच्या हाताला हिसका मारून त्या आरोपीने ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जालना शहरातील कदीम ठाण्यात सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. सईद खान ऊर्फ बिलाल याकूब खान (२०, कबाडी मोहल्ला, जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी सईद खान ऊर्फ बिलाल याकूब खान हा अटकेत आहे. पोस्कोचे गुन्हे पिंक मोबाइल या पथकाकडे तपासासाठी असतात. दरम्यान, ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपीस कदीम ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले होते. या ठिकाणी चौकशी सुरू होती. कदीम जालना पोलिस ठाण्यात सईद खान याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. कदीम जालना ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मजहर, सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

१५ फूट उंचीवरून उडी
सईदने हातकडीसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसका मारत दुसऱ्या मजल्यावरून मोकळ्या जागेत उडी मारली. जवळपास १५ फूट उंचावरून उडी मारल्याने सईद जखमी झाला आहे. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी पिंक मोबाइलच्या सहायक पोलिस निरीक्षक निशा बनसोड यांनी फिर्याद दिली. याचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...