आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा सुनावली:मारहाण करणाऱ्या आरोपीस कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकास मारहाण करणाऱ्या उद्धव आसाराम गोरे (गोंधनखेडा) याला कोर्ट उठेपर्यंत व सात हजार रुपये नुकसान भरपाई करण्याची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील बी. व्ही. इंगळे यांनी दिली. न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी ही शिक्षा सुनावली.

१३ जुलै २०१७ रोजी १०.३० वाजता गोंधनखेडा येथे आरोपीने सार्वजनिक रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी येऊन दगड का टाकत आहेत, असे म्हणून मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. पुरावा, युक्तिवाद लक्षात घेऊन आरोप सिद्ध झाल्यानुसार कोर्ट उठेपर्यंत व ७ हजार रुपये देण्याची शिक्षा असा दंड ठोठावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...