आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:परमिट बार फोडणाऱ्या आरोपीस केले जेरबंद

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गरीब शहा बाजार येथील हॉटेल नीलम परमिट बार फोडून दारूच्या बाटल्या चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले. सुनिल ऊर्फ तल्ला वैजिनाथ भुतेकर (जालना) असे संशयिताचे नाव आहे. गरीब शहा बाजार येथील हॉटेल नीलम फोडून चोरट्यांनी १९८७६ रूपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. या प्रकरणी सुनील हजारे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सपोउपनि. पवार हे करीत होते.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरील गुन्हा हा सुनिल ऊर्फ तल्ला वैजिनाथ भुतेकर (लोधीमोहल्ला, जालना) याने त्याच्या साथीदारासह केला आहे, अशी माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्याला घरातून ताब्यात घेतले. त्याला सदरील गुन्ह्याबाबत विचारले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...