आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाफराबाद:पॅरोल रजेवरून फरार आरोपी दोन किमी पाठलाग करून पकडला

जाफराबाद/ टेंभुर्णी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांत सराईत असलेल्या मलकापूर जिल्हा बुलडाणा येथील मनोजसिंग सिकंदरसिंग टाक यास जाफराबाद पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून जाफराबाद शहरात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करून पकडले. यात पोलिसांनी या दरोडेखोराचा दोन किमी पळत जात पाठलाग केला व शहरातील किल्ला भागात पकडले. सेंटर जेल नाशिक येथून पॅरोल रजेवरून फरार असून त्याच्यावर १८ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

अट्टल गुन्हेगार टाक हा जाफराबाद शहराच्या परिसरात दरोडा, जबरी चोरी करण्याच्या हेतूने रेकी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. पोलिस निरीक्षक रमेश जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पोलिसांनी पूर्णा नदीच्या अलीकडील पेट्रोल पंपाजवळ पाठलाग करून त्यास पकडले. तो विदर्भ, खान्देशमध्ये अट्टल गुन्हेगार म्हणून वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हेगार आहे. दरम्यान, टेंभुर्णी हद्दीत मध्यरात्री दुचाकी व घरफोडी आर्म ॲक्टनुसार दाखल गुन्ह्यात आकाशसिंग जगदीशसिंग गोखे (रा.वडवणी, जि. बीड) यास टेंभुर्णी पोलिसांनीही मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. जाफराबाद पोलिसांनी फिल्मस्टाइल पाठलाग करून आराेपी टाक याला पकडून अटक केली. याकामी पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, पोलिस उपनिरीक्षक विजय तडवी, पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन, प्रकाश पठाडे, शाबान तडवी, राजेंद्र दांडगे आदींनी परिश्रम घेतले. गुन्हेगारास पकडण्यास जाफराबाद येथील नागरिकांनीही सहकार्य केले, अशी माहिती उपनिरीक्षक व्ही. एस. तडवी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...