आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंताला येणे भाग असते मात्र ती श्रध्दा पाखंडी नसावी. ती त्या सुष्टीनिर्मात्याला प्रिय असली पाहिजे. मनुष्याच्या संसारूपी गाड्याच्या साम्राज्याला संत्संगाची जोड आवश्यक असल्याचे आंनद चैतन्य महाराज यांनी दहीफळ खंदारे येथील सत्संग सोहळयाच्या समारोपात सांगितले.
मनुष्याचे युद्ध बाहय जगासोबत अतंरमनासोबतच चालू आहे. कारण रोगी मानसासोबत रोगी गेला तर तो कसा बरा होईल जोपर्यन्त निरोगी मनाचा सहवास त्याला होणार नाही तोपर्यन्त तो बरा होणार नाही. या संसारातील प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. कोणी मनाने तर कोणी तनाने दुःखी आहे.
या संसारात शारीरीक दुःखी मानसिक दुःखी आहेच सर्व गोष्टीची सांसारीक उपलब्धतता असताना सुध्दा मनुष्य दुःखी आहे संसारीक सुखात कोणी पन्नीकडून तर कोणी त्याच्याच आपत्याकडून दुःखी आहे त्याच दुःखी माणसाला खरी गरज ही सत्संगांची आहे. मनुष्याने जर काही मागायचे असेल तर त्याने देवालाच मागीतले पाहीजे. भगवंत आपल्याला देईल मात्र त्या योग्यतेचे आपण असले पाहीजे. कारण तो आपल्या सोबत असल्यावर भितीचे कारण नाही.
मनुष्याच्या नशीबात जे आहे ते मिळणारच आहे त्यासाठी वेळेची प्रतीक्षा करावी लागेलच. सिकंदराला सुध्दा सगळे वैभव सोडून जावे लागले सोबत काहीच येणार नाही. मनुष्याचे आयुष्य हे दोनच दिवसाचे आहे जन्म आणि मूत्यू यामधल्या अंतरात मिळणाऱ्या संधीचा उपयोग हा सत्संगाचा धरला तर जीवन सार्थकी होईल. रिकाम्या हाताने जन्म घेऊन आलेला मनुष्य हा रिकामा हातानेच जाणार आहे. त्याला खरी गरज धनाची नाही तर भक्ती मार्गाने जाण्याची गरज आहे.
कारण हा मनुष्य जन्म परत मिळणार नाही मिळालेला जन्म हा ज्ञानरूपी दिवा लावण्यासाठी असला पाहिजे. मनुष्याने श्रद्धावान असले पाहिजे तर धर्माला प्राप्त होतो तो धर्म कोणता तर सत्यतेचा आचरणाचा अहिसेचा शिलतेचा असला तर पाहीजे तरच तो सनातन धर्माचा मूळ असल्याचे सिध्द होते. आजकाल धर्माला दुषण देणाऱ्याची संख्या मोठी असून आपण आपला सनातन धर्माचे पालन केले पाहिजे. तलवार किती जरी मोठी असली तरी तिची भूमीका ही विभाजणांची आहे. आपली भूमिका ही सुईची असली पाहिजे जे की फाटलेले शिवते व त्याला एकत्रित ठेवते. एकत्रित ठेवण्याची खरी भूमिका ही सनातन धर्माची असुन त्याचे सर्वानी पालन करणे गरजेचे आहे. समाजात नास्तीक आणि आस्तीक परमार्थीक आणि अपरमार्थीक यांचा भरणा असला तरी ज्या ठिकाणी आस्तीकता असते त्याच ठिकाणी धर्माचे अस्तीत्व असते. ते टिकणे गरजेचे आहे. भगवान श्रीकृष्ण, मर्यादा पुरूषोत्तम राम यांचा आदर्श यांचा सघर्ष आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
कुठल्याही क्षेञात तुम्ही जा त्यासाठी तुम्हाला मेहनत साधना तपाचीच गरज असतेच. ज्याच्या आयुष्यात संघर्ष आलेला असतो पांडवाच्या दुःखात भगवान श्रीकृष्णाची साथ होती परंतू ज्या वेळस पांडवाकडे सुखाची नांदी असते त्यावेळेस कृष्णाकडून कुंतीने वरदान घेतले की आमच्या सुखात तुच नाही नाही तर त्या सुखाचा पांडव स्वीकार कसा करतील त्यासाठी तुझा सहवासच आमच्यासाठी सुख आहे. मनुष्याच्या आयुष्यात मर्यादा महत्वाच्या आहेत त्याचा संस्कार प्रत्येकावर असला पाहिजे आपला आपला भारत हा विश्वगूरु आहे. भारताची भूमिका ही मार्गदर्शकाची असून सध्याची भारताची वाटचाल ही महासत्ते बरोबर विश्वगूरूच्या दिशेने चालू आहे. असेही महाराजांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.