आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंशत: अनुदानित शिक्षकांचे समान टप्प्यावर समायोजन करण्याचा १२ डिसेंबर २०२२ चा सेवा संरक्षणाचा आदेश काढण्यात आला आहे. याअंतर्गत वर्ष २०२२ २३ च्या संच मान्यतेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पुढील शाळा मिळेपर्यंत विनावेतन तसेच त्या काळातील सेवा समाप्ती असणार आहे. शाळा न मिळाल्यास या शिक्षकांना थेट घरचा रस्ता दाखवल्या जाणार असल्याने या निर्णयामुळे अंशत: अनुदानित शिक्षकांवर संकट आले आहे. जिल्ह्यात अंशत: अनुदानित २८६० शिक्षक कार्यरत आहेत.
खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. दरम्यान, वर्ष २०२२-२३ च्या संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप २०२२ -२३ च्या संच मान्यता झाल्याच नाहीत, तसेच अनेक पदे सन २०१८ - १९ पासून विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे रिक्त झालेली आहेत. आताच्या संच मान्यतेमध्ये ती पदे कशी येतील, जर ती रिक्त पदे दिसणारच नसतील तर कुणाचे समायोजन करणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. दरम्यान, ज्यांना सेवा संरक्षण समायोजन देण्यात आले आहे.
ज्या शाळेवरील शिक्षकाचे पद उडणार आहे, त्याचे समायोजन संबंधित ६० टक्केवारी तसेच पद पाहिजे असेही म्हटले आहे. यामुळे हा निर्णय आमच्यासाठी धोकादायक असल्याचे संतोष गाडेकर यांनी सांगितले. दरम्यान,२०१६ पासूनचा हा निर्णय असून जे अतिरिक्त ठरले त्यांना संबंधित शासकीय कार्यालयात अतिरिक्त कामाची जबाबदारी देत त्यांना वेतन अदा केले जात होते. या वेळी मात्र सेवा समाप्ती, विनावेतन राहावे लागेल.
हा आदेश रद्द करावा
या वर्षीच्या संच मान्यतेवरून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, यापूर्वीच शिक्षक अतिरिक्त ठरले. ही बाब पूर्णपणे चुकीची असून हा आदेश रद्द करावा. अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या शिक्षकांचा विचार करून यामध्ये दुरुस्ती व्हावी. -गणेश सुरासे, शिक्षक समन्वयक संघ, जालना
२०२२-२३ या वर्षात संच मान्यता
संच मान्यता २०२२-२३ या वर्षात झाली. यातील अतिरिक्त शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अतिरिक्त शिक्षकाला संबंधित शाळा मिळाली नाही तर त्यांना त्या कालावधीत वेतन मिळणार नाही. शिवाय सेवा समाप्त होईल. पुढील काळात संधी मिळाल्यास मागील वाया गेलेला काळाची गणती होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.