आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कोश्यारींना हटवेपर्यंत आंदोलने सुरूच राहतील

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांचा अवमान करण्याचे नियोजित षड््यंत्र राज्यातील संविधानिक पदांवरील व्यक्तींकडून सातत्याने सुरू आहे. हे निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोपर्यंत या पदावरून हटणार नाही तोपर्यंत विविध मार्गांनी आंदोलने सुरूच राहतील, अशी रोखठोक भूमिका आ. कैलास गोरंट्याल यांनी घेतली.

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगड येथे ‘निर्धार शिवसन्मानाचा’ हे लाक्षणिक आंदोलन केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जालना येथे शनिवारी मराठा क्रांती मोर्चासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ‘निर्धार शिवसन्मानाचा’ हे लाक्षणिक आंदोलन केले. आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...