आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभाग:एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमातून कृषी विभाग थेट बांधावर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी जालना जिल्ह्यात “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत तब्बल जिल्हातील ३०० अधिकारी, कर्मचारी यांनी २४० गावात बैठकातून एकाच दिवशी ६ हजार २०० शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला आहेे. हा उपक्रम ३० नोव्हेंबर पर्यंंत चालणार आहे.

जालना जिल्ह्यात कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र खरपुडी व बदनापूर येथील शास्त्रज्ञ याच्या माध्यमातून १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यात “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद गावातील मनोज लाठे यांच्या शेतावर भेट देऊन आंबा, पेरू, डाळिंब, सिताफळ, जांभुळ या फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

या बरेाबरच जालना जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाची अंमलबजावणी केली.सदर उपक्रमात जिल्हातील ३०० अधिकारी, कर्मचारी यांनी २४० गावात गांव बैठका घेऊन ६ हजार २०० शेतकऱ्यांच्या एकाच दिवशी अडचणी जाणून घेऊन सोयाबीन, कापून व फळपिकांबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान, शेतीसाठी दिवसा बीज पुरवठा मिळावा, मागेल त्याला सोलर पंप अनुदानावर मिळावे, अन्नधान्य, फळपिके, भाजीपाला इत्यादी पिकांना किमान हमी भाव मिळावा, पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी मागेल त्याला शेततळे अस्तरीकरणसह अनुदानात वाढ व्हावी, पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे अटी शर्ती मध्ये शिथिलता आणावी इत्यादी अडी अडचणी सदर भेटी दरम्यान सांगितल्या.

या अभियानामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी शेती विषयक योजना व तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...