आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वालूर येथील पुरातनकालीन सिध्देश्वर मंदिर, श्री वाल्मीकेश्वर मंदिर व नव्याने स्वच्छ करण्यात आलेल्या भगवान नगर मधील बारवेस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी भेट देवून जीर्णोध्दारासंदर्भात ग्रामस्थांबरोबर हितगुज केले.
यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, बारव सवर्धन समिती मराठवाडा प्रमुख मल्हारीकांत देशमुख, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, अग्रणी बँक प्रबंधक सुनील हट्टेकर, गटविकास अधिकारी विष्णु मोरे, मंडळ अधिकारी तानाजी माने, सरपंच संजय साडेगांवकर, उद्योजक शैलेश तोष्णीवाल, गणेश मुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकारी व ग्रामस्थांच्या समवेत प्राचीन सिध्देश्वर मंदिर , श्री वाल्मीकेश्वर मंदिर, सिद्राम बादशाह मठ व बारव यास भेट दिली. या प्राचीन व ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारकाच्या जिर्णोध्दारासंदर्भात माहिती घेवून ग्रामस्थांबरोबर हितगूज केले. या मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या आराखड्यास प्रशासकीय मंजूरी देवून पुरातन विभागाकडे निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा सरपंच संजय साडेगांवकर यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली. सिध्देश्वर मंदिर दरवर्षी पावसाने गळत आहे.
त्यामुळे या प्राचीन, ऐतिहासिक राज्यसंरक्षित स्मारकाच्या जिर्णोध्दाराकरीता सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आयुक्तांनी वालुर येथील ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.