आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाणेगाव येथील मध्यम प्रकल्पाला कालवाच अस्तीत्वात नसल्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निमॉन झाला आहे. प्रकल्पाच्या दरवाज्यापासून चारी खोदण्यात आली आहे. चारी द्वारे पाणी वळवण्यात येऊन नदीपात्रात पडते. त्यानंतर खालील गावांना पाणी उपलब्ध होते. परंतु नदीपात्रात पाणी सोडणे म्हणजे पाण्याचा अपव्यय होईल. म्हणुन कालव्याचे काम पूर्ण करा, नंतरच पाणी सोडा, अशी भूमिका पळसखेडा ठोंबरी येथील नागरीकांनी घेतली आहे. दरम्यान, गव्हाण संगमेश्वर, तोंडोळीच्या ग्रामस्थांची तहाण भागवण्यासाठी सध्या नदी पात्रातुनच मार्ग असून त्यातूनच पाणी सोडण्याची मागणी हे ग्रामस्थ करत आहेत. यामुळे एकीकडे मागणी तर दुसरीकडे विरोध होत असल्याने या तीन गावात चांगलाच पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.
भोकरदन तालुक्यातील बाणेगाव मध्यम प्रकल्पाने चार वषॉपूर्वी भिषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी तालुक्यातील गावांना टॅंकरद्वारे बाणेगाव मध्यम प्रकल्पाने पाणी पुरवीले होते. सध्या राजूर, लोणगाव, पळसखेडा ठोबरी, बाणेगाव, खामखेडा, केदारखेडा, बरंजळा यासह १५ गावांना बाणेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. कडक उन्हाळा असल्यामुळे प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. प्रकल्पाच्या खाली असणाऱ्या तोंडोळी, गव्हाण संगमेश्वर या गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून बाणेगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडावे, यामुळे पाणी टंचाई दूर होईल अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने लघुपाटबंधारे विभागाला पोलीस बंदोबस्त देऊन पाणी सोडले होते. मात्र, बेकायदेशीरपणे पाणी सोडल्याने विरोध झाला. कालव्याचे काम पूर्ण करा, नंतरच पाणी सोडा, अशी मागणी पळसखेडा ठोंबरी येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. प्रकल्पाच्या पाण्यावरून वाद होत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला कालवाच नाही, प्रकल्पाच्या पाणी सोडण्यात येणाऱ्या दरवाजा समोर फक्त कालव्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे.
मात्र, पुलाच्या समोर कालवा नसून, फक्त सपाट जमीन आहे. प्रकल्पाच्या दरवाजातून पाणी सोडले जाते. परंतु चारी खोदून सदर पाणी नदी पात्रात वळवण्यात आलेले आहे. नदीपात्रासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह लागतो. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे पाण्याचा उपयोग कमी होऊन, नासाडी जास्त होते. अशी प्रतीक्रीया परीसरातील नागरीकांनी व्यक्त केल्या आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत साठा किती उपलब्ध आहे. या विषयीची अचूक माहीती प्रशासनास कशा पद्धतीने माहीती उपलब्ध होते ही बाब संशोधनाची ठरत आहे.
पाण्याचा अपव्यय टाळावा
बाणेगाव मध्यम प्रकल्पातून परीसरातील गावांना पाणी पुरवठा होतो. दिवसेंदीवस कडक उन्हाची तिव्रता जाणवत आहे. या प्रकल्पातील पाणी साठा तीन महीने आसणे गरजेचे आहे. पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावे, बेकायदेशीर पाणी सोडण्यात येऊ नये, जणे करून भाविष्यात पाणी टंचाईला सर्वांना तोंड द्यावे लागेल.
गजानन नागवे, माजी उपसभापती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.