आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजामध्ये जाती भेद आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांना कधीच राजकीय सत्ता मिळू शकत नाही. बंधू भावाने समाजामध्ये वागल्यास निश्चितपणे नवनिर्माण होणे शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल यांनी ईद मिलन कार्यक्रमात केले.
टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने ह. मोहमंद पैगंबार सर्वांसाठी या अभियाना अंतर्गत जालना शाखेच्या वतीने अनाथ, विधवा, आत्माहत्याग्रस्त शेतकरी आणि रंजल्या गांजल्यासाठी ईद मिलनचे विषेश आयोजन शुक्रवार रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी गोरंट्याल अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, राज्यातील जनता नेहमी फुले-शाहू-आंबेडकर विचाराच्या सोबत राहिलेली आहे. परंतू काही मंडळी समाजामध्ये विष पेरण्याचे काम करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा उद्योग करीत आहे.
त्यांना कधीच यश मिळणार नाही. आणि जनतेने देखील त्यांच्या राजकीय डावाला ओळखलेले आहे. ही महत्वाची बाब असल्याचे गोरंट्याल यांनी सांगीतले. टिपू सुलतान ब्रिगेडने रंजल्या गांजल्यासाठी ईद मिलनचा हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम घेतल्यामुळे आपल्याला मनस्वी आनंद झालेला आहे. असा कार्यक्रम आपण पहिल्यांदास पाहत आहोत. टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली यांचे प्रमुख मार्गदर्शनात ते बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाजाने फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार समाजात रूजवित असतांना १ कोटी २० लाख मराठी मुस्लीमांना सोबत घेवून मोहमंद पैगंबर यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी दिलेला महत्वपुर्ण संदेश समजून घ्यावा. ईस्लाम धर्माने जाती भेद मानला नाही. आणि आपण सर्व एकच आई-वडीलांची लेकरे आहोत अशी शिकवन देवून माणसामानसाला जोडण्याचे काम केलेले आहे.
परंतू काही मंडळी जाती भेदाचे भांडण लावून समाजामध्ये दुई पसरवित आहे. ही दुर्दैवाची बाब असून खऱ्या अर्थाने मानव कल्याणाची लढाई उभारणे काळाची गरज असल्याचे सुभानी अली यांनी सांगीतले. यावेळी अनाथ, विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि गोरगरीबांना कपडे, साड्या इतर समाज उपयोगी साहित्य आमदार कैलास गोरंट्याल आणि शेख सुभान अली यांच्या हस्ते केले. याप्रसंगी टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष जहिर पठाण, जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, सय्यद करीम बिल्डर यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी राम सावंत, सय्यद नदीम, डॉ. विशाल धानुरे, शेख शकील, नंदाताई पवार, जावेद बेग, मोहमंद उस्मान मोमीन, शेख शमशोद्दीन, शेर जमाखान, रविंद्र गाढेकर, अफसर चौधरी, ॲड. कामरान खान, सलिम काजी, मुजमिल कुरेशी, मुफ्तार खान, हाफेज फारूख, चंद्रकांत रत्नपारखे, वसीम उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.