आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ व्याख्यान:कोरेगाव भिमाचा लढा मानवमुक्तीसाठी‎ लढला गेला ; प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भिमाकोरेगाव लढा मानव‎ मुक्तीसाठी लढला गेला‎ असल्याचे प्राचार्य डॉ. राजकुमार ‎ ‎म्हस्के यांनी सांगितले.‎ तक्षशिला बुद्ध विहारात भीमा ‎ ‎कोरेगाव येथील शौर्य गाजवणाऱ्या ‎शूरवीराच्या गुणगौरव‎ करण्यासाठी आयोजित विशेष ‎ ‎ व्याख्यानात ते बोलत हाेते.‎ यावेळी भिकाजी साळवे, प्रा.‎ एस. एन. कांबळे, सरणागत, बी.‎ के. बोर्डे आदींची उपस्थिती होती. ‎

प्राचार्य डॉ. म्हस्के म्हणाले,‎ छत्रपती शिवरायांच्या‎ स्वराज्यामध्ये समता व‎ सामाजिक न्याय व बंधुभाव‎ लोककल्यानासह महिला वृद्धांचे‎ संरक्षण केल्या जायचे. त्याकाळी‎ अन्यायाविरुद्ध न्याय मिळत होता.‎ अशा रयतेच्या राज्यामध्ये जनता‎सुखा समृद्धीने नांदत होती. परंतु‎ मनू व्यवस्थेच्या प्रस्थापित‎ पेशवाईंनी रयतेच्या स्वराज्याच्या‎ रक्षण न करता स्वराज्याचा नाश‎ केला.

ज्या विचारातून‎ स्वराज्याचा नाश झाला त्याच‎ मनुवादी पेशवाई विचाराच्या‎ विरोधात व छत्रपती शिवरायांच्या‎ रयतेच्या राज्याचे पुर्नर निर्माण‎ व्हावे व माणसाला माणूस म्हणून‎ स्वाभिमानाने जगता यावे. यासाठी‎ भीमा कोरेगावचा लढा शूरवीरांनी‎ लढला असल्याचे सांगितले.‎ यावेळी संबोधी इंगोले हिने‎ गीतगायन केले.‎

बातम्या आणखी आहेत...