आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माझी कन्या भाग्यश्रीचा आहेर कुटुंबाला लाभ

अंबड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला व बाल विकास प्रकल्प जालना अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री या योजनेतून वालसावंगी येथील देवराव आहेर व त्यांची पत्नी संतोषी देवराव आहेर या दोन्ही अपंग दाम्पत्याच्या पाल्याला २५ हजारांचा धनादेश बँक आँफ महाराष्ट्र धावडा शाखेकडून देण्यात आला.

वालसावंगी येथील अंगणवाडी सेविका जया बाळू मोकासरे यांच्या वॉर्ड कार्यक्षेत्रातील अपंग दापंत्य देवराव आहेर व त्यांची पत्नी संतोषी आहेर यांनी दोन मुलीवर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. दोन्ही मुलींचे संगोपन हेच आमचे कर्तव्य असल्याचे ते सांगतात. यामुळे या कुटूंबियांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविका जया मोकासरे यांनी पाठपुरावा केला. वेळो वेळी कागदपत्रांची पुर्तता करून अखेर या योजनेचा लाभ नुकताच मिळाला आहे.

यामुळे आहेर कुटूंबातील दोन्ही मुलींचे १८ वर्ष वयापर्यंत ठेवीचा महीला व बाल विकास प्रकल्पातील माझी कन्या भाग्यश्री या योजणेतून पात्र ठरलेल्या या दोन्ही अपंग दापंत्याच्या पाल्याला ज्योती देवराव आहेर याच्या नावाना पंचवीस हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र बँकेच्या धावडा शाखेचे व्यवस्थापक हितेश दामोर यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी धावडा येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे हीतेष कुमार धामोर, तुषार बेडवाल, गणेश राठोड, महादू सपकाळ, तानाजी सपकाळ, अंगणवाडी सेविका जया मोकासरे, ज्योती देवराव आहेर, देवराव आहेर, संतोषी देवराव आहेर यांच्यासह बाळू मोकासरे, फैजुल्ला पठाण, हरी बोराडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...