आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती:जिल्ह्यात भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली, तर मराठवाड्यात दुसरी

भोकरदन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) राज्यातील बाजार समितीच्या सन २०२१-२२ या वर्षातील कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील एकूण ५ बाजार समित्यांपैकी भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात १३१.५० गुणांसह एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी गुणानुक्रमे ३० वा मिळाला असून मराठवाडा विभागात दुसरा तर जालना जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संतोष ढाले यांनी दिली.

नुकतीच पणन संचालक सुनील पवार यांनी प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर केली. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यामध्ये स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यामुळे बाजार समित्यांची योजना उपक्रमाबाबतची माहिती पणन संचालनालयाने संकलित केली असून याचा उपयोग पणन व्यवस्थेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होणार आहे.

सन २०२१-२२ मध्ये भोकरदन बाजार समितीने स्मार्ट प्रकल्पासाठी निर्धारित केलेल्या निकषा नुसार उल्लेखनीय कामगिरी केली असुन केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली व आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन बाजार समितीने अंतर्गत रस्ते, मोठे गोडाऊन, सिमेंट काँक्रीटचे गाळे यासह मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रमाणे बाजार समितीने पिंपळगाव रे. उपबाजार पेठेमध्ये गेल्या ५ वर्षांपासून नवीन हिरव्या मिरचीची बाजारपेठ विकसित केली आहे. त्यामुळे पिंपळगाव येथून माेठ्या प्रमाणावर मिरचीची आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात होत असून त्याचा फायदा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. भोकरदन बाजार समितीने स्मार्ट योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे, निर्मला दानवे, आशा पांडे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्यासह भाजपचे जि.प. व प.स.सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सभापती कौतिकराव जगताप, उपसभापती रामलाल चव्हाण, बाजार समितीचे सचिव संतोष ढाले यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यातील इतर बाजार समित्यांचे लक्ष वेधून घेतले
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कौतिकराव जगताप, उपसभापती रामलाल चव्हाण, संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी अतिशय शिस्तबद्ध व कुशलतेने बाजार समितीचा कारभार चालवल्यामुळे भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती मराठवाड्यात दुसरा, तर जालना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आली. संपूर्ण राज्यातही बाजार समितीने ३० क्रमांक पटकावून राज्यातील इतर बाजार समित्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...