आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा साहित्य:अनाथांचे नाथ होणे हाच खरा आनंद सोहळा होय' ; मजहर सय्यद यांचे प्रतिपादन

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनाथांचे नाथ होणे हाच खऱ्या अर्थाने आनंद सोहळा आहे, असे प्रतिपादन कदिम जालना ठाण्याचे पोलिस निरीक्षक मजहर सय्यद यांनी येथे केले.अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठा आरक्षणाचे तज्ज्ञ विश्लेषक राजेंद्र कोंढरे यांच्या जन्मदिवसानिमित्त शहरातील अनाथ आश्रमालयात क्रीडा साहित्य व मैदानावर फोकस लाईट बसवण्यात येऊन अंधाराची समस्या दूर करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू महासभेचे प्रदेश संघटनमंत्री धनसिंह सूर्यवंशी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्यासह अशोक पडूळ, ॲड. शैलेश देशमुख, प्रा. संतोष कऱ्हाळे, अॳॅड. संभाजी चुनखडे यांची उपस्थिती होती. मजहर सय्यद पुढे म्हणाले की, परिवारासह गोरगरीब, अनाथ यांच्या यांच्या सानिध्यात जन्मदिवस साजरा केल्यास तोच खऱ्या अर्थाने आनंद सोहळा ठरेल. मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम सर्वांनी अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, गरजेच्या सेवेतून आत्मिक समाधान मिळते.

बातम्या आणखी आहेत...