आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळगाव रेणुकाईं:पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला; 37 तासानंतर मिळाला मृतदेह

पिंपळगाव रेणुकाईं4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रसंगी ग्रामस्थांच्या मदतीने सलीम सय्यदला वाचवण्यात यश आले.

जोरदार पाऊस झाल्याने अवघडराव सावंगी येथील नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यातून दोन जण वाहून गेले होते. यात एक जण वाचला होता, तर दुसऱ्याचा तब्बल ३७ तासांनंतर गावानजीकच असलेल्या गाळात फसलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सापडला आहे. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील सलीम सय्यद व शाहेद सय्यद हे दोन सख्खे चुलत भाऊ धाडवरून काम आटोपून घराकडे निघाले होते.

परंतु बुधवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आला होता. गावाकडे जाण्याची ओढ असल्यामुळे ते दोघेही पुरातून येत होते. परंतु, याचप्रसंगी ते वाहू लागले होते. याप्रसंगी ग्रामस्थांच्या मदतीने सलीम सय्यदला वाचवण्यात यश आले. परंतु शाहेद हा पाण्याच्या वेगाने पुरात वाहून गेला. तेव्हापासून शाहेदचा शोध घेतला जात होता.

शुक्रवारी पुन्हा ग्रामस्थांनी सकाळीच शोधमोहीम सुरू केली असता शाहेदचा मृतदेह गावापासून हाकेच्या अंतरावरच एका खड्ड्यात गाळात फसलेला आढळून आला. या वेळी महसूलच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता शाहेदवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

कुटुंबाचा आधार गेला
शाहेदच्या घरची परिस्थिती गरीब आहे. शाहेदचे वडील मिळेल ते काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु मागील काही वर्षांपासून शाहेदने धाड येथे स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. शाहेदचा मृत्यू झाल्याने घरातील आधारच हरपला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...