आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह आढळला:शिवनगरमध्ये आढळला‎ तरुणाचा मृतदेह‎

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील‎ शिवनगर भागात एका ३२ वर्षीय‎ तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची‎ घटना घडली. कृष्णा शिवाजी पवार‎ (रा. योगेश्वरी कॉलनी, जालना)‎ असे मृत तरुणाचे नाव आहे.‎ कृष्णा पवार हा मंगळवारी दुपारी‎ घरातून बाहेर गेला होता. रात्री‎ उशिरापर्यंत तो परत आला नाही.‎ रात्री ११ वाजेच्या सुमारास काही‎ नागरिकांना कृष्णाचा मृतदेह‎ आढळून आला.

याची माहिती‎ कदीम जालना पोलिसांना देण्यात‎ आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव‎ घेऊन पंचनामा केला. मृतदेह‎ शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य‎ रुग्णालयात पाठविण्यात आला.‎ ओळख पटल्यानंतर याची माहिती‎ नातेवाइकांना देण्यात आली.‎ दरम्यान, कृष्णा पवार याच्या अंगावर‎ मारहाणीच्या खुणा वा जखमा‎ नसल्याचे पोलिसांनी सांगितले.‎ कृष्णाच्या मृत्यूचे कारण अद्यापही‎ अस्पष्ट आहे.‎

बातम्या आणखी आहेत...