आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:खून करून तरुणाचा‎ मृतदेह टाकला विहिरीत‎

श्रीक्षेत्र राजूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोक्यात काठीने मारहाण करून नंतर‎ मृतदेह विहिरीत टाकून तरुणाचा खून ‎केल्याची घटना ‎भोकरदन‎ तालुक्यातील ‎पळसखेडा पिंपळे‎ येथे उघडकीस‎ आली आहे.‎रत्नदीप भांबळे‎ (२५ ) असे‎ मृताचे नाव आहे.‎ रत्नदीप भांबळे हा तरुण ३१‎ जानेवारी राेजी घरातून बाहेर‎ गेल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी न‎ आल्यामुळे नातेवाइकांनी शाेधाशोध‎ सुरू केली. मंगळवारी सायंकाळी‎ त्याचा मृतदेह विहिरीत आढळून‎ आला. त्याच्या डाेक्यात काठीने‎ मारहाण करण्यात आली असून,‎ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला‎ आहे. हसनाबाद पाेलिस ठाण्यात‎ अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎

पळसखेडा पिंपळे येथील रत्नदीप‎ भांबळे याने ३१ राेजी सकाळी ९‎ वाजेदरम्यान भाऊ अमर भांबळे यांना‎ थिगळखेडा फाट्यावर बांधकामाच्या‎ ठिकाणी कामावर साेडले. नंतर घरी‎ किराणा सामान आणून दिले. दुपारी १‎ वाजेच्या दरम्यान रत्नदीप भांबळे‎ माेटारसायकल घेऊन शेतात गेला.‎ सायंकाळपर्यंत घरी न आल्यामुळे‎ फाेन केला असता, माेबाइल बंद‎ आढळून आला.

यानंतर‎ नातेवाइकांनी पळसखेडा पिंपळे‎ येथील शेतात जाऊन शाेध घेतला‎ असता त्यांना आंब्याच्या झाडाखाली‎ रक्त सांडलेले दिसले. तसेच‎ चप्पलही सापडली. त्यानंतर मृतदेह‎ विहिरीत आढळून आला. आराेपीचा‎ शाेध घेण्यासाठी श्वानपथकास‎ पाचारण करण्यात आले हाेते.‎ घटनास्थळास पाेलिस अधीक्षक‎ अक्षय शिंदे, उपविभागीय पाेलिस‎ अधिकारी इंदलसिंग बहुरे, गुन्हे‎ शाखेचे सुभाष भुजंग, सहायक‎ पाेलिस निरीक्षक संताेष घाेडके‎ आदींनी भेट दिली. पाेलिस‎ उपनिरीक्षक फकीरचंद फडे, शिवाजी‎ देशमुख, साेळुंके, प्रदीप सरडे, नरहरी‎ खार्डे, नीलेश खराट, राहुल भागिले‎ आदींनी पंचनामा केला.‎

बातम्या आणखी आहेत...