आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ:हरवलेली माणसं हे पुस्तक विद्यापीठ अभ्यासक्रमात

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील क्रियाशील लेखक म्हणून ओळख असलेले साहित्यिक दादासाहेब थेटे यांच्या ‘हरवलेली माणसं’ या पुस्तकाचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठअंतर्गत मॉडल डिग्री कॉलेज, घनसावंगीच्या प्रथम वर्ष मराठी अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अभ्यासमंडळाच्या बैठकीत हरवलेली माणसं या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय झाला.

गद्य साहित्य म्हणून अनिल अवचट यांच्या माणसं या पुस्तकाबरोबरच हरवलेली माणसं या पुस्तकाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. एका वर्षांमध्ये या पुस्तकाच्या चार आवृत्याचा खप झाला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. समाजतल्या तळागाळातील माणसांचे केवळ दुःखच या पुस्तकातून न मांडता त्या दुःखाच्या निरकारणाचे अनेक कृतिशील प्रयोग या पुस्तकाद्वारे त्यांनी आपल्या या पुस्तकात मांडले आहेत.

हे पुस्तक काल्पनिक विलास नसून वास्तव जगण्यातील अनुभवाचा शब्दबद्ध दृष्टांत असून त्याच्या अनुभवाने संवेदनशील माणसांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक प्रेरणा निर्माण होतील. हे पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच समाजशील आणि राष्ट्रनिर्माणासाठी ऊर्जा देईल असा विश्वास पुस्तकाचे लेखक दादासाहेब थेटे यांनी व्यक्त केला. दरम्यान, थेटे यांचे हरवलेली माणसे याचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेशाबद्दल साहित्यिक दादासाहेब थेटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...