आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवमुर्ती सर्कल:भाऊगर्दीला लागला ब्रेक; देवमूर्ती सर्कलवर महिला राज

सिंधी काळेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहराला लागून आणि तालुक्यातील महत्वाचा असलेल्या देवमुर्ती सर्कल मधील भाऊगर्दीला यंदा लगाम लागला आहे. गुरुवारी आरक्षण सोडतीत देवमुर्ती सर्कल हे सर्वसाधारण महिला साठी राखीव झाले आहे. तर पंचायत समिती देवमुर्ती गण ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झाले आहे. सिंधी काळेगाव गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या गटामध्ये महिलाराज येणार आहे. गत निवडणूकीत या तीन जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यामुळे आता इच्छुकांना आपल्या पत्नीसाठी किंवा घरातील एखाद्या महिलेसाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

गत पंचवर्षीला या गटातून कॉग्रेसच्या सैदाबी परसूवाले विजयी होऊन अडीच वर्ष समाजकल्याण सभापती झाल्या होत्या. तर देवमुर्ती गणातून द्वारकाबाई खरात विजयी होऊन जालना पंचायत समीती च्या उपसभापती पदावर विराजमान झाल्या होत्या. तर इंदेवाडी गणातून प्रियंका शेजूळ या विजयी झाल्या होत्या . एकंदरीत तीनही सदस्यांना अडीच वर्ष सभापती आणि उपसभापती मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...